
योगेश रामटेके, प्रतिनिधी, सावली
सावली , दिनांक ३० जून २०२६:
चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चिकली चक क्र. २ (ता. मूल) येथील बिगर वनक्षेत्रात एका वाघाचा मृतदेह आढळून आला आहे.
वाघ (नर)
• वय: ६ ते ७ वर्षे
• घटनास्थळ: सर्व्हे नंबर ७८, चिकली चक क्र. २ (बिट: चितेगाव, राऊंड: राजोली, परिक्षेत्र: सावली, ता. मूल)
• जीपीएस निर्देशांक: N 20.142924, E 79.700332
३० जून २०२६, दुपारी १:०० वाजता आढळून आला.
वनविभागाची कार्यवाही:
सदर वाघाचा मृत्यू साधारणपणे एक दिवस आधी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर
श्री विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर
विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली
मुकेश भांदककर प्रतिनिधी WPSI
राजू काहीलकर Eco प्रो चंद्रपूर
5. डॉ. विकास गरखैकार , Assistant Comissioner, mul, तालुका पशुचिकित्सालय मूल
. Dr. कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी TTC चंद्रपूर
. Dr. आकाश गोमकाळे, पशुधन विकास अधिकारी, बोथली तालुका सावली
अक्षय नारनवरे बायोलॉजिस्ट चंद्रपूर वनविभाग
वरील पशूवैद्यकीय अधिकारी आणि नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटी (NTCA) च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत घटनास्थळावर मृतदेहाची पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदन राजोली रोपवाटिकेत पूर्ण करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

