
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी, दि. 23 जून : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने 14 मे 2026 रोजी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने 28 जून 2026 रोजी चंद्रपूर येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामोर्चामध्ये गडचिरोली जिल्ह्यासह चामोर्शी तालुक्यातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी तसेच एससी व एसटी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, या उद्देशाने बुधवार, दि. 24 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता साधू बाबा कुटी, हनुमान मंदिर (मुल रोड), चामोर्शी येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेमध्ये आगामी महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या, आंदोलनाची दिशा तसेच समाजबांधवांचा सहभाग यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, जिल्हा गडचिरोली तसेच ओबीसी कृती समिती, चामोर्शी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

