
बुलढाणा – बुलडाण्यामध्ये कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. २ डॉक्टरांसह १४ आरोग्य कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलले आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी शिक्षण विभागानंतर आता आरोग्य विभागावर कारवाई केली आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शासनाकडून रुग्णसेवेसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात हलगर्जी करणाऱ्या आणि कर्तव्यातील दिरंगाईसोबतच असुविधांचा कळस गाठणाऱ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील २ आरोग्य अधिकाऱ्यांसह १४ कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी एकाच वेळी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी १० पटसंख्येच्या आत असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील ३५ शिक्षकांना गुलाबराव खरात यांनी निलंबित केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. आता आरोग्य विभागावर कारवाई करत गुलाबराव खरात यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हाभर याची चर्चा होत आहे. गुलाबराव खरात यांनी अचानक जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यावेळी डॉक्टरांचे गैरहजर आणि अनेक सुविधांचा अभाव यामुळे ही कारवाई करण्यात आली. newsjagar
निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची माहिती –

– डॉ विशाल सुरुशे (वैद्यकीय अधिकारी) Dr. Vishal Surushe प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी आणि एक कर्मचारी.
– डॉक्टर विवेक थिगळे Dr. Vivek Thigale (वैद्यकीय अधिकारी), सागर जाधव Sagaer Jadhav (फार्मासिस्ट), अर्चना राऊत Archana Raut (स्वास्थ्य अभ्यागता) कोमल राठोड Komal Rathor (आरोग्य सेविका) संगीता देशमुख Sangita Deshmukh (आशा वर्कर ) प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी.
– क्षितिज पवार Kshitij Pawar (कनिष्ठ सहाय्यक), सुरज खरात Suraj Kharat (परिचर) प्राथमिक आरोग्य केंद्र उदयनगर
– प्रियंका इंगळे Priyanka Ingale (आरोग्य सेविका), दिपाली सोनवणे Dipali Sonawane , गीता बर्वे Gita Barve , सुजाता गायकवाड Sujata Gaikwad, ज्योत्स्ना खोले Jyotsna Khole (आशा वर्कर) पिंपरी गवळी, प्राथमिक आरोग्य केंद्र.

