
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
तालुका भाजप व युवा मोर्चा कडून उपक्रम
कोरची — दिनांक ०५ जून २०२६

निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आज कुमकोट येथील राजमाता मातेश्वरी मंदिर परिसरात ‘जागतिक पर्यावरण ‘ दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली.
पाहुण्यांनी आपल्या भाषणात प्लास्टिकचा वापर टाळणे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी झाडे लावण्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य श्री. देवरावजी गजभिये सर, तालुकाध्यक्ष श्री. सदाराम नुरूटी, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हासचिव श्री. आनंदराव चौबे, श्री. विनोद कोरेटी श्री. मनोजदादा टेंभुर्णे व तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
#BJP
#news jagar #newsjagar
#korchi

