chamorshi congress news

नितेश गट्टीवार न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/चामोर्शी
नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षपद बदली नंतर आता तालुकाअध्यक्षपद बदलण्याचे वारे सुरू असून चामोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी कालिदास बुरांडे यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी चामोर्शी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू धोडरे यांनी केली आहे.
राजू धोडरे यांनी न्यूज जागर प्रतिनिधीशी बोलताना ही केवळ वैयक्तिक मागणी नसून जनतेची व कार्यकर्त्यांचीही भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू धोडरे म्हणाले की, कालिदास बुरांडे हे बहुजन समाजातील सक्रिय व धडाडीचे कार्यकर्ते असून, ते काँग्रेस पक्षाला योग्य न्याय देऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवसंजीवनी मिळून पक्षाचे वैभव वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“कालिदास बुरांडे हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत. समाजातील गोरगरीब, गरजू लोकांसाठी ते दिवस-रात्र धावून जातात. लोकांमध्ये त्यांची चांगली ओळख व विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात यावी,” असे धोडरे यांनी म्हटले.
विद्यमान अध्यक्षांबाबत विचारले असता, “मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही,” असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कालिदास बुरांडे हे गटबाजी करणारे व्यक्तिमत्त्व नसून पक्षासाठी सकारात्मक व सर्वसमावेशक पद्धतीने काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्ते आणि जनतेचा पाठिंबा लक्षात घेऊन कालिदास बुरांडे यांनाच चामोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा देण्यात यावी, अशीही मागणी राजू धोडरे यांनी केली आहे.

