
न्युज जागर, नागपूर
२६ मे २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित युवा काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत वापरण्यात आलेल्या पत्रकावर दिक्षाभूमीच्या शिखरावर हिंदुत्ववादी भगवा ध्वज दाखविण्यात आला होता. या परिषदेला युवा काँग्रेस प्रभारी अजय चिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. Register Case Against Congress Office-Bearers for Tampering with Image of Deekshabhoomi — Vanchit Bahujan Aghadi Demands
नागपूर येथील ऐतिहासिक दिक्षाभूमीच्या चित्राशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी छेडछाड केली आहे. दिक्षाभूमी ही समता, बौद्ध धम्म आणि कोट्यवधी अनुयायांच्या अस्मितेचे प्रतीक असून, तिच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करणे हे ऐतिहासिक विकृतीकरण व धार्मिक भावना दुखावणारे कृत्य आहे. याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. #VBA
गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

