
नितेश गट्टीवार गडचिरोली :
दुर्गम भागातील पशुपालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक सुविधा सुरू केली आहे. आता जनावरे आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज उरलेली नाही. ‘१९६२’ या टोल-फ्री क्रमांकावर केवळ एक कॉल केल्यास, औषधांसह डॉक्टर थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत किंवा बांधावर पोहोचणार आहेत.
या सुविधेची खास वैशिष्ट्ये:अत्याधुनिक मोबाईल क्लिनिक: या फिरत्या दवाखान्यात प्राथमिक शस्त्रक्रिया, तपासणी आणि सर्व प्रकारच्या औषधांची सोय उपलब्ध आहे.पूर्वी जनावरांना बैलगाडी किंवा ट्रॅक्टरने दवाखान्यात नेताना वेळ आणि पैसा वाया जायचा, तो आता वाचणार आहे.

डॉक्टर केवळ उपचारच नाही, तर जनावरांचा आहार, स्वच्छता आणि बदलत्या हवामानानुसार घ्यायची काळजी यावरही मार्गदर्शन करणार आहेत.
शासकीय सुविधेसाठी अत्यंत कमी नोंदणी शुल्क आकारले जाणार असून, कॉल करण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही.आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या तासातील उपचार जनावरांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, त्यासाठी ही ‘मोबाईल व्हेटर्नरी क्लिनिक’ सेवा मैलाचा दगड ठरणार आहे.

