
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.९ मे: नुकताच जाहिर झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या चामोर्शी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावीचे 60 पैकी 48 व 12वीं चे 77 पैकी 77 बोर्ड परीक्षेत जिला परिषद हायस्कूल स्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी चे निकाल अनुक्रमें 80 %, 100% लागलेला असून वर्ग 10 वी मधुन विद्यालयातून नंदिनी चंद्रकांत लटारे 81 % घेऊन प्रथम क्रमांक,कुमारी अक्षरा रमेश मडावी 70 % द्वितीय क्रमांक तर प्राजक्ता गव्हारे 69 % घेऊन त्रुतीय क्रमांक आले आहे.
तसेज इयत्ता बारावी मध्ये मध्य हर्ष विद्युत हालदार 80% टक्के घेऊन प्रथम क्रमांक कु.स्नेहल उंदीरवाडे 76 % घेऊन द्वितीय क्रमांक ,कु.सात्विका रमेश अग्गु 75.33% घेऊन त्रुतिय क्रमांक आले आहे, कु.दिया तपन दास 74% घेऊन चतुर्थ क्रमांक ,पंचम क्रिश हलदार 74.33 तर ध्रुव प्रांजय वडेट्टीवार 70% गुणासह सहाव्या क्रमांक पटकावला आहे.

या प्रसंगी उद्घाटक चंद्रशेखरजी मस्के तर प्रमुख अतिथि उत्पल जी मंडल, पुरूषोत्तमजी घ्यार सदस्य शाळा व्यवस्थापन समिति , रमेश जी मडावी पालक सदस्य यांचे उपस्थितित संपन्न झाले. अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश तालापल्लीवार हे उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिले , संचालन प्रा.नेत्रा वडेट्टीवार तर आभार पदमा शिवरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका हर्षा रंदये,संगिता टीचकुले , अश्विनी नारा,रितिक पीपरे आणि श्रीमती मनीषा आभारे आदिंनी सहकार्य केले.

