
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी दि.८ मे :
चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दि.९मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरात दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी,सहाय्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी सदर शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


