
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.६ :
गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू हा अपघात नाही.तो व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे. अशा ढोंगी डॉक्टरांवर केवळ निलंबनाची सौम्य कारवाई करून चालणार नाही. थेट बडतर्फीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष राहूल वैरागडे यांनी केली आहे.
बडतर्फ केल्यास त्या लोकांना शिस्त येईल आणि इतरांना धडा मिळेल.आज अनेक शासकीय विभागांमध्ये काही अधिकारी स्वतःला ‘राजा’ समजतात आणि सामान्य नागरिकांना ‘प्रजा’. हा गैरसमज तात्काळ दूर झाला पाहिजे. या देशात लोकशाही आहे—इथे सत्ता जनतेची आहे, आणि अधिकारी हे सेवक आहेत, शासक नाहीत.प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सामान्य लोकांचे जीव जात आहेत—ही बाब अजिबात सहन केली जाणार नाही.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, दोषींना वाचवणं थांबवा, आणि आरोग्य व्यवस्थेत तात्काळ सुधारणा करण्यात यावी ,अशीही मागणी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष राहूल वैरागडे यांनी केली आहे.

