
नितेश गट्टीवार गडचिरोली:
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार रामदास मसराम यांनी रात्री १२ वाजता अचानक धडक भेट देत आरोग्य व्यवस्थेची कडक पाहणी केली. या मध्यरात्रीच्या तपासणीत रुग्णालयातील अनेक त्रुटी उघडकीस आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.
पाहणीदरम्यान रुग्णालयातील स्वच्छतेचा अभाव, औषधसाठ्याची अपुरी व्यवस्था तसेच काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आढळून आली. यावर आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तीव्र शब्दांत जाब विचारत तत्काळ सुधारणा करण्याचे कडक आदेश दिले.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना अनेकांनी सेवा व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत आमदारांनी, “रुग्णांच्या जीवाशी खेळ सहन केला जाणार नाही. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला.
त्याप्रसंगी काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार सर,नगरसेवक आशिष काळे, माजी नगरसेवक उस्मान पठाण, सिराज पठाण, आसिफ शेख,राकेश चव्हाण, भावेश मुंगणकर, गजानन भोयर नरेश शहारे, वैद्यकीय अधीक्षक अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी आत्राम.रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

