
नितेश गट्टीवार,गडचिरोली दि.२ मार्च:
उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे आज दि.२ मार्च रोजी आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळिराजा शेत पाणंद रस्ते योजनेवर आढावा बैठक घेऊन बैठकीत कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसंजित प्रधान, नायब तहसीलदार विलास तुपट, नायब तहसीलदार कुंभरे, भूमी अभिलेख अधिकारी सेलोकर आदि उपस्थित होते, तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व महसूल अधिकारी ऑनलाइन मीटिंगद्वारे सहभागी झाले होते.

