
नितेश गट्टीवार,
गडचिरोली दि.३०मार्च :
जिल्ह्यात विविध उद्योग प्रकल्पासाठी सुरू असलेल्या सुपीक शेत जमिनीचे अधिग्रहणाविरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि.३० मार्च रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन अधिग्रहित करू देणार नाही. जर बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न झाला, तर काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल. असा इशारा काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, काँग्रेस नेते ऍड. राम मेश्राम सह काँग्रेसचे पदाधिकारी, गडचिरोली चामोर्शी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

