
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि. २५ मार्च:
पोलीस दल व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मा. दंतेश्वरी रुग्णालय, चातगाव येथे दिनांक 21 मार्च 2026 रोजी “प्रोजेक्ट संजीवनी”अंतर्गत ही शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेले 13 व गोंदिया जिल्ह्यातील 1 अशा एकूण 14 सदस्यांचा समावेश होता.
आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने एकूण 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मुख्य प्रवाहात पुनर्स्थापना व सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य अधिक सुखकर व्हावे, यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे.

