
नितेश गट्टीवार गडचिरोली,(चामोर्शी)दि.२३ मार्च :
गडचिरोली जिल्ह्यातील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी येथे एनएसयुआय अधिकृत युनिटच्या वतीने शहीद दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या त्यागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. देशासाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे आज आपण सुरक्षित आहोत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रसंगी अमित किनेकार (तालुका अध्यक्ष, चामोर्शी), आयुष पाल (उपाध्यक्ष) तसेच कोमल कोवे, सागर मेश्राम, अदिती कोडापे आणि महाविद्यालयीन एनएसयुआय युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते.


