
नितेश गट्टीवार गडचिरोली,दि.२२ मार्च
आरमोरी मार्गावर वाहन नादुरुस्त झाल्याने अडकलेल्या छत्तीसगडमधील सुमारे ४० ते ५० मिरची तोड मजुरांना आ. रामदास मसराम यांनी मदतीचा हात दिला. बसचालकाने मध्येच मजुरांना उतरवून बस घेऊन गेल्याने ते उन्हात पायी निघाले होते.
आरमोरीजवळ हा प्रकार लक्षात येताच आमदार रामदास मसराम यांनी मजुरांची विचारपूस करून नाश्ता-पाण्याची व्यवस्था केली व देसाईगंजपर्यंत वाहनाची सोय केली. या मदतीबद्दल मजुरांनी त्यांचे आभार मानले.


