
नितेश गट्टीवार/ दि.१६ मार्च
आज संसद भवनाच्या मकर द्वाराबाहेर गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी इतर काँग्रेस खासदार तसेच विरोधी पक्षांच्या खासदारांसमवेत केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करून धरणे दिले.
देशभरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे सामान्य जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. घरगुती गॅस उपलब्ध होत नसल्याने लाखो कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमर्शीअल गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक खानावळी, हॉटेल व रेस्टॉरंट बंद पडलेले आहेत. ही समस्या नैसर्गिक नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी निर्माण केलेली समस्या आहे. या समस्याचा सामना करण्या ऐवजी मोदीजी आसाम मध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. ही शोकांतिका असल्याचा विरोधी पक्षांच्या खासदारांनी म्हटले आहे.


