
:- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देसाईगंज तालुक्यातील विविध गावांमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विसोरा, किन्हाळा, मोहटोला व उसेगाव येथील शाळांमध्ये आयोजित या कार्यक्रमांना आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..

यावेळी आमदार रामदासजी मसराम यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत देशप्रेम, संविधान मूल्ये व शिक्षणाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रीय एकात्मता व सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शिक्षकवर्ग, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य व नाट्यप्रयोगांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.

