प्रतिनिधी/रुपेश सलामे
कोरची (ता. कोरची) : तालुका कोरची अंतर्गत राजमाता देव मंडई, कुमकोट येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उपस्थिती लावून राजमाता देवीचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. आमदार रामदासजी मसराम यांनी राजमाता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तालुक्यातील जनतेच्या सुख-समृद्धी व विकासासाठी प्रार्थना केली. उपस्थित भाविकांशी त्यांनी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, धनपाल मिसार सर, शिक्षणाधिकारी जि. प गडचिरोली,माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, प्राचार्य बळीराम चौरे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरूभाई भामानी, शेंडे साहेब तसेच ग्रामस्थ, देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडला
