
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
दि. 3/1/25
येथील लगान क्रिकेट ग्राउंड वर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांचे हस्ते, माजी आमदार कृष्णा गजबे यांचे अध्यक्षतेखाली, पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, डॉक्टर विनोद मिळावी, डॉक्टर शैलेंद्र बीसेन, रोशन बोरकर, सदरूभाई भामाणी, देवराव गजभिये, नंदकिशोर वैरागडे, शालीकराम कराडे, राष्र्टपाल नखाते,आनंद चौबे तहसीलदार प्रशांत गड्डम, हर्षलताबाई भैसारे यांच्या उपस्थित पार पडले. परिसरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार कृष्ण गजबे यांनी तहसीलदारांना संबोधित करताना सांगितले की, क्रीडांगणासाठी जागेची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.तातडीने पाठपुरावा करण्यात यावा. ग्रामीण भागातील युवकांना खेळासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यास शारीरिक आणि मानसिक विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नंदकिशोर वैरागळे, हर्षलता भैसारे, तहसीलदार प्रशांत गड्डम,यांनी मार्गदर्शन केले खेळामुळे युवकामध्ये शिस्त, सद्भावना, नेतृत्व गुण, आणि एकाग्रता वाढते तसेच ते व्यसनापासून दूर राहण्यास मदत होते अशाप्रकारे क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनामुळे कोरची आणि परिसरातील क्रिकेट प्रेमी मध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या आयोजनामुळे युवा खेळाडूंना आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. भविष्यात ते मोठ्या स्तरावर पोहोचू शकतात असे मत उपस्थितानि व्यक्त केले.सदर स्पर्धा 13 जानेवारी पर्यंत राहणार असल्याने क्रिकेट प्रेमीनी याचा लाभ घ्यावा असे क्रिकेट मन्डळाचे अध्यक्ष नसरू भामाणी यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सन्चालन किशोर ढवळे यांनी केले, प्रास्ताविक डा. स्वप्नील राऊत तर आभार प्रदर्शन नसरू भामाणी यांनी केले

