
आमदार रामदास मसराम सोबत जिल्हा निरीक्षक सचिन नाईक व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची उपस्थिती
कोरची – कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक आमदार रामदास मसराम साहेब, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे आणि जिल्हा निरीक्षक तथा आरमोरी विधानसभा निरीक्षक सचिनजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, नगरपंचायत चे नगराध्यक्ष कोरची हर्षलताताई भौसारे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेमीलाताई काटेंगे, काँग्रेस कमिटी जिल्हा महासचिव हकीमउद्दिम शेख, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरूभाई भामानी, उपसरपंच परमेश्वर लोहांबरे ,उद्धव कोरेटी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

