Stop illegal liquor sale from near school premises - demand of school committee & teacher

सोनू वाळके, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
चामोर्शी
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री केली जाते, बाहेर राज्यातून, जिल्ह्यतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूसाठा गडचिरोली जिल्ह्यात आणल्या जाते. या अवैध दारू विक्री व वाहतुकीला रोखण्यात पोलीस प्रशासनाने महत्वाची भुमीका बजावावी यासाठी चामोर्शी शहरातील शिक्षक समिती व शक्षक वृंद यांनी पोलीस स्टेशन ला निवेदन दिले आहे. News Jagar

चामोर्शी येथी वाळवंटी चौकात जिल्हा परिषद नूतन शाळेजवळ पानटपरी वर सर्रास दारू विक्री केली जात असून दारू पिऊन लोक तिथेच दारूच्या बाटला शाळेच्या आवाराजवळ फेकतात, नाईलाजाने शाळेतील शिक्षकांना रोज बाटली हटाओ मोहीम राबवावी लागते, यामुळे शाळकरी मुलांना व शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. Stop illegal liquor sale near zp school premises – demand of school committee and teacher

काही लोक दारू पिऊन सरळ शाळेच्या आवारात घुसून दारू पितात , त्यांना पोलीस प्रशासनाची काहीच भीती नाही, यामुळे शिक्षक व मुले यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे, यासाठी शिक्षक समिती व शिक्षक वृंद यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक श्री अमोल कादबने PI AMOL KADABANE यांना निवेदन देऊन परिसरातील अवैधरित्या दारूविक्री व पिणाऱ्या लोकांची गर्दी ही बंद करावी, जिल्हा परिषद शाळा परिसरातील अवैध दारूविक्री बंद करा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
आता शिक्षक समिती चे लक्ष्य लागले आहे की पोलीस प्रशासन यावर काय अंकुश लावेल.

