
तालुका प्रतीनीधी श्याम यादव
तालुका कोरची शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन तालुका क्रीडा समिती कोरची तर्फे दिनांक 8 /09/2025 रोज सोमवार ला श्रीराम विद्यालय च्या प्रांगणावर सोहळा संपन्न झाला. सदर कार्येक्रम चे उद्घाटक तसेच विशेष अतिथी मा. अमित दास गटशिक्षणाधिकारी पं स कोरची व मा. नंदुजी गोबाडे प्राचार्य श्रीराम विद्यालय कोरची तसेच प्रा. डॉक्टर मुरलीधर रुखमोडे तसेच मा. हरिश्चंद्र जी मडावी सर मुख्याध्यापक पार्वताबाई विद्यालय कोरची यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देवदास हटवार सर तालुका क्रीडा सचिव तसेच तसेच संचालन सुरेश गद्देवार सर विद्यालय कोडगूल तसेच आभार राजेंद्र मस्के सर मानले.तसेच श्री हटवार सर श्री औरासे सर श्री कराडे सर श्री चौधरी सर मडावी मॅडम पुल्लूरवार सर खोब्रागडे सर धन्यवाद सर मस्के सर शिवणकर सर बनकर सर बावणे सर कोरेटी सर तांडेकर सर बाविस्कर सर लंजे मॅडम इत्यादी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.


