
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त मूल शहर युवक काँग्रेसतर्फे अभिवादन!

मूल : आदिवासी समाजाचे महानायक, थोर क्रांतिकारक व स्वातंत्र्यलढ्यातील जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस, मूल शहरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आदरणीय संतोष भाऊ रावत यांच्या नेतृत्वाखाली हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी नगर परिषद सदस्य अशोक भाऊ येरमे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मिथुनसिंग पटवा यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याला उजाळा देत त्यांच्या सामाजिक आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले.

याप्रसंगी मूल शहर काँग्रेस कमिटीचे राहुल लाटेवार, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मिथिलेश गेडाम, कार्याध्यक्ष, शहर सचिव सूरज आत्राम, अमोल नामेवर, रोशन भोयर, राहुल बारसागडे यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आदिवासी समाज बांधव -भगिनी मोठया संख्येने पारंपरिक वेशभूशेत हजर होते.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
जय बिरसा! जय जोहार! जय आदिवासी!
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
जिल्ह्यातील अशाच नवनवीन बातम्या व जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क करा..
श्री. चेतन म कामडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
न्यूज जागर!
🔊आवाज सत्याचा
संपर्क मो. 9307553014
News Jagar..

