
२५ दिवसांपासून शिक्षकाचा न्यायासाठी संघर्ष! न्यायालयाच्या आदेशानंतरही शिक्षण विभागाची दिरंगाई; मुख्यमंत्री फडणवीसांकडे नैताम यांची धाव!
न्यूज जागर!चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली :
न्यायालयाचे आदेश असूनही एका शिक्षकाला न्यायासाठी गेल्या २५ दिवसांपासून उपोषणाला बसावे लागत असेल, तर शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. शिक्षक दिलीप गोपीनाथ नैताम यांचा न्यायासाठीचा संघर्ष आज २५ व्या दिवशीही शिक्षण विभागा समोर आंदोलन सुरूच आहे.

त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, मोहोर्ली (ता. चामोर्शी) येथील सहायक शिक्षक दिलीप नैताम यांच्या सेवा पुनर्स्थापनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह शाळा न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी नेमकी कोण रोखत आहे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
🔴२५ दिवसांचे आंदोलन, तरीही प्रशासनाला जाग कधी येणार?
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), संबंधित मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षक दिलीप नैताम यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून न्यायासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्हा इंटक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करावी, शिक्षक नैताम यांना सेवेत पुनर्स्थापित करावे आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे.
आता प्रश्न केवळ एका शिक्षकाच्या नोकरीचा नाही, तर न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. २५ दिवसांच्या संघर्षानंतर तरी शिक्षण विभागाला जाग येणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧
News Jagar..
जिल्ह्यातील बातम्या व जाहिरातींसाठी आमच्याशी सम्पर्क करा.
श्री. चेतन म कामडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो. 9307553014
न्यूज जागर! आवाज सत्याचा

