
विधिवत पूजा करून घेतले बाप्पाचे दर्शन, महाप्रसादाचे आयोजन
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी :आलापल्ली शहरातील न्यू फॉरेस्ट टेकडी कॉलनी,श्रमिकनगर वार्ड नं.१ येथील प्रसिद्ध श्री विघ्नहर्ता युवा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.या मंगलमय सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून महाआरती केली आणि बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.मंडळाच्या वतीने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी संपूर्ण परिसर “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
याच ठिकाणी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि एकतेचा सण असून अशा कार्यक्रमांमुळे तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढते,असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,वार्डातील नागरिक,महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

