Oplus_131072
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली: “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंधन व निवारण कायदा – 2013”, ज्याला POSH Act असे संबोधले जाते, हा भारतातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या कार्यस्थळी लैंगिक छळापासून संरक्षण देणे, त्यांच्यासाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त कामाचे वातावरण निर्माण करणे. असा असून अद्याप या कायद्या अंतर्गत जिल्ह्यात कुठल्याही विभागात, संस्थेत समिती नाही, केंद्राच्या हा कायदा केवळ कागदावर धूळ खात असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला व याची त्वरीत अमलबजावणी करण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या कायद्यानुसार:
प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था किंवा कार्यालय, जिथे 10 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, तेथे आंतर संस्था तक्रार समिती (Internal Complaints Committee – ICC) ची स्थापना करणे कायद्याने बंधनकारक आहे.
ही समिती महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सक्षम असावी. महिलेला कामाच्या ठिकाणी मानसिक किंवा शारीरिक त्रास झाल्यास ती समितीकडे अधिकृत तक्रार दाखल करू शकते.
मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी क्षेत्रांमध्ये POSH कायद्यानुसार कोणतीही समिती स्थापन झालेली नाही. हे अत्यंत गंभीर बाब असून, महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
1. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी संस्थांना POSH कायद्यानुसार तत्काळ आंतरिक तक्रार समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावेत.
2. सर्व कार्यालयांमध्ये POSH कायद्याबाबत प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवण्यात यावेत.
3. POSH समित्यांची स्थितीबाबत स्वतंत्र तपासणी अहवाल तयार करून जनतेसमोर सादर करण्यात यावा.
4. POSH कायदा न पाळणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्यात यावी.
महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड स्वीकारार्ह नाही. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे गडचिरोली जिल्ह्यात महिलांना योग्य न्याय, सन्मान व सुरक्षित कार्यस्थळ मिळावे, अशी जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा करीत आजाद समाज पार्टीने मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी आजाद समाज पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे उपस्थित होते.
