
पदाधिकारी, ग्राहक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी बांधवांना उपस्थितीचे आवाहन
चामोर्शी : ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, ग्राहकांमध्ये जनजागृती तसेच त्यांच्या विविध समस्या व प्रश्नांवर प्रभावीपणे चर्चा करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका शाखा चामोर्शी यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही विशेष बैठक रविवार, दि. ३० ॶॉगस्ट रोजी सकाळी १० वाजता केवळराम हरडे वाणिज्य महाविद्यालय, मुल रोड, चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली आहे.

ग्राहकांची होणारी फसवणूक, बाजारपेठेतील विविध समस्या, ग्राहकांचे अधिकार, तक्रार निवारण व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील ग्राहक व शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ग्राहक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका शाखेचे अध्यक्ष विनोद आर. खोबे यांनी केले आहे.

