
कुरखेड्यात पूर्वतयारी बैठक; आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार तसेच महागाईच्या झळांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ३१ ऑगस्ट रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी कुरखेडा येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार रामदासजी मसराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत महामोर्चाच्या नियोजनासह नागरिकांची जास्तीत जास्त उपस्थिती, गावागावांत जनजागृती आणि मोर्चाच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महामोर्चा निर्णायक ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आता एकजुटीने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन आमदार रामदास मसराम यांनी केले.
३१ ऑगस्टला महामोर्चा
मोर्चाचे नेतृत्व : आमदार रामदासजी मसराम
दिनांक : ३१ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १२ वाजता
मार्ग : आमदार रामदास मसराम यांच्या कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, वडसा येथे
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार आणि महागाईने त्रस्त नागरिकांनी या महामोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी एकजुटीची ताकद दाखवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
न्याय हक्कांसाठी एकजूट होऊया; महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊया!

