
“राहुल गांधी यांच्या ‘छात्राओं की गूंज’ कार्यक्रमाला इंटक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती”
प्रतिनिधी!
पुणे, २२ ऑगस्ट २०२६ : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्राओं की गूंज’ या कार्यक्रमास भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ (इंटक)चे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाष माछरे यांच्यासह इंटकच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

यावेळी इंटकच्या पुणे जिल्हाध्यक्ष सुवर्णा माने, पुणे शहराध्यक्ष ममता शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अक्रम भाई तसेच इंटकचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित काँग्रेस नेते श्री. सतेज (बंटी) पाटील, श्री. विजय वडेट्टीवार, काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत जगताप तसेच काँग्रेसच्या इतर पदाधिकारी व नेत्यांची इंटकच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान संघटनात्मक विषयांसह कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमामुळे काँग्रेस व इंटकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात कामगारांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
📝 Chetan Kamde News jagar….

