
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:भिलाई (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या ‘इंडो-नेपाळ इन्व्हिटेशनल नॅशनल ओपन कराटे स्पर्धेत’ गडचिरोलीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स (SOS) शाळेने सुवर्णयश संपादन केले आहे. शाळेचा ११ वर्षीय विद्यार्थी सारंग केळझरकर याने या राष्ट्रीय स्पर्धेत अफाट कौशल्य दाखवत सुवर्णपदकासह ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा किताब आपल्या नावावर केला.
या थरारक स्पर्धेत विशेष आकर्षण ठरलेली गोष्ट म्हणजे, सारंगने स्वतःपेक्षा मोठ्या म्हणजेच १३ वर्षे वयोगटातील खेळाडूविरुद्ध अत्यंत दमदाराने खेळ करत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

इतर खेळाडूंचीही चमकदार कामगिरी
या नामांकित स्पर्धेत सारंगसह इतर होतकरू खेळाडूंनीही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे. यामध्ये खालील खेळाडूंचा समावेश आहे: नारायणी दुमपट्टीवार, आपुल्की कुरुडकर , श्वेता नरोटे पूजा टेकम मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य विनय बनसोड आणि उपप्राचार्य डॉ. रीना अने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, खेळाडूंना घडवण्यात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक शर्मिष वासनिक, शुभम कोंडे आणि प्रणाली भंडारे यांच्या मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

