
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील मारोडा येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारोती बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी समितीला अधिक बळ मिळणार आहे.
मारोती बारसागडे यांच्या नियुक्तीबद्दल गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून, हर्षद सोमणकर, संदीप सोमणकर, जीवन बारसागडे, राकेश चलाख, प्रदीप सोमणकर, देवा चूधरी, आशिष सातपुते, रुपेश गव्हारे, देविदास चलाख आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गावातील विविध तंटे व वाद सामोपचाराने सोडविण्यासह सामाजिक ऐक्य आणि शांतता टिकविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

