
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे २ ऑक्टोबर २०२६ ला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक काँग्रेस भवन मूल येते संपन्न..
जिल्हा प्रतिनिधी..
मूल , दि. ९ ऑगस्ट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी संदर्भात रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी काँग्रेस भवन, मूल येथे आयोजन समितीची बैठक घेण्यात आली. इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी दत्तात्रय समर्थ आणि चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी ठराव क्र. ०५/२६ नुसार आयोजन समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिवेशनाचे योग्य नियोजन, प्रभावी समन्वय आणि विविध जबाबदाऱ्यांचे वाटप याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. व आगामी काळात आयोजन समितीच्या माध्यमातून अधिवेशनाच्या तयारीला वेग देण्यात येणार आहे.
यावेळी दत्तात्रय समर्थ यांनी राष्ट्रीय अधिवेशनाची संपूर्ण रूपरेषा व नियोजन याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून कामगारांच्या विविध समस्या, कामगारांचे हक्क, संघटनात्मक विषय, कामगार हिताचे प्रश्न तसेच बेरोजगार युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण अधिवेशन होत असल्याने ते भव्य आणि यशस्वी करण्यासाठी इंटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे काम करणार आहेत. तसेच अधिवेशनाच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या बैठकीला प्रफुल गज्जलवार सचिव चंद्रपूर जिल्हा, सतीश सुंकरवार सहसचिव चंद्रपूर जिल्हा, किरण पोरेड्डीवार मूल तालुका अध्यक्ष, अनिल कुंटावार मूल तालुका उपाध्यक्ष, आकाश ठाकरे मूल शहर अध्यक्ष, साईनाथ जिडगलवार, मूल शहर उपाध्यक्ष, फुलचंद गोंगले मूल शहर सचिव, अनिल निकोडे सहसचिव मूल, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस मूल चे तालुका अध्यक्ष पवन निलमवार, सभासद रामकुमार चिताडे, तुकाराम गुरनुले, अनिल दिकोण्डवार, रंजित येणगंटीवार, अंकुश कामडी, दिनेश गुरनुले, क्रिष्णा बोरेवार यांच्यासह इंटकचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
“राष्ट्रीय अधिवेशन भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने तयारीला लागावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“कामगारांचा हक्क, युवकांचे भविष्य, महिलांचा सन्मान आणि सामाजिक न्याय — यासाठी इंटकची लढाई अधिक व्यापक आणि मजबूत करूया.”🤝
— भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), चंद्रपूर जिल्हा
📝Chetan Kamde News Jagar..

