
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळासाठी सुपीक शेतीजमिनीचे अधिग्रहण करण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखालील गडचिरोलीतील शेतकरी शिष्टमंडळीने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन केली. यावेळी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी गडचिरोलीतील शेतकरी शिष्टमंडळीला घेऊन राज्यमंत्री मुरलीधर माहोळ यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या भावना व अडचणी मांडल्या.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ज्या जमिनींचा विचार सुरू आहे त्या अत्यंत सुपीक असून हजारो शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहेत. या जमिनींचे अधिग्रहण झाल्यास अनेक शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण होईल. त्यामुळे विकासकामांना विरोध नसला तरी सुपीक शेतीजमिनींचे संरक्षण करून पर्यायी शासकीय किंवा पडीत जमिनीवर विमानतळ उभारण्याचा पर्याय शासनाने स्वीकारावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार श्यामकुमारजी बर्वे, महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळात मनोहर पा. पोरेटी, ऍड. दुष्यन्त नामदेव कीरसान, दिवाकर निसार (हिरापूर), प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एलटीवार सह शेतकरी उपस्थित होते.

