
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि.९.जूलै:
काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे यांची चामोर्शी प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन सामाजिक, पत्रकारिता आणि चामोर्शी तालुक्याच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

भेटीदरम्यान पत्रकारांच्या समस्या, ग्रामीण भागातील पत्रकारितेसमोरील आव्हाने, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका तसेच चामोर्शी तालुक्याच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद साधला. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिल्यास समाजहिताचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी चामोर्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद खोबे, सचिव अरुण गव्हारे, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, कोषाध्यक्ष मारोती बारसागडे, उपाध्यक्ष श्रावण वाकोडे, धनराज वासेकर, सदस्य प्रफुल्ल कोटांगले व प्रेस क्लबचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

