
न्युज जागर, गडचिरोली
कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी ,संच मान्यता धोरण आणि बीएलओ,एस.आय.आर. कामाच्या सक्तीविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दिनांक :- 5/7/2026 ला प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गडचिरोली येथे जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत नियोजन सभा संपन्न झाली. या नियोजन सभेमध्ये सर्वांनुमते 9 जुलै 2026 रोज गुरूवार ला ठिक 11.00 वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे
आजच्या नियोजन सभेमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,कास्टाईब शिक्षक संघटना,शिक्षक भारती संघटना,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्टाईब कल्याण महासंघ संघटना,आदर्श शिक्षक समिती संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना यासह इतर समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

आजच्या या सभेला श्री रघुनाथ भांडेकर सर,श्री योगेश ढोरे सर,श्री चक्रपाणी कन्नाके सर,श्री पुंडलिक देशमुख सर,श्री बापु मुनघाटे सर,श्री प्रविण सहारे सर,श्री प्रदिप सेलोकर सर,श्री अशोक रायसिडाम सर,श्री खिरेंद्र बांबोळे सर,श्री ओमप्रकाश साखरे सर,श्री दिवाकर नारनवरे सर,श्री राजेश चिल्लमवार सर,श्री अशिम बिश्वास सर, श्री रमेश रामटेके सर,श्री आशिष धात्रक सर,श्री देवेंद्र लांजेवार सर,श्री गंगाधर मडावी सर,श्री साईनाथ अलोने सर, श्री जयंत राऊत सर,श्री संजय मडावी सर,श्री समीर भजे सर,श्री अमरदिप भुरले सर, श्री सचिन मेश्राम सर,श्री सुरेश चुधरी सर,श्री जितेन्द्र रायपुरे सर,श्री संजय येलेवार सर,यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

