
टू-डी इको हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन; वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट देत पदाधिकाऱ्यांना दिले मार्गदर्शन.
अमित कत्तीवार |विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या वैद्यकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री सचिवालय, मुंबई तसेच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख आदरणीय मंगेशजी चिवटे यांनी रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना उपस्थिती दर्शविली. त्यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिक, वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या टू-डी इको हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी प्रमुख उपस्थिती लावली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना हृदयरोगाचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि वेळेवर तपासणी हेच गंभीर आजारांपासून बचावाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर आदरणीय मंगेशजी चिवटे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, गडचिरोली कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन कार्यालयाची सविस्तर पाहणी केली. वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना शासकीय वैद्यकीय सहाय्यता योजना, उपचार, आर्थिक मदत आणि विविध आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या कार्याची त्यांनी माहिती घेतली.
कार्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन केले. अत्यंत दुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंगेशजी चिवटे म्हणाले, “शासनाच्या वैद्यकीय सहाय्यता योजना या सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहेत. या योजनांची माहिती प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उपचाराची सुविधा पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे. जनतेचा विश्वास हेच आपले सर्वात मोठे बळ आहे.”
यावेळी त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व्यापक जनजागृती, तत्पर समन्वय आणि सेवाभावी कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगेशजी चिवटे यांच्या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात जनसेवा करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जात असल्याचे या दौऱ्यातून अधोरेखित झाले. त्यामुळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याला आणखी बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या वेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपस्तीत विदर्भ प्रमुख प्रवीण जी शर्मा तसेच संपर्क प्रमुख सत्यापाल कुट्टरमारे,महिला संपर्क प्रमुख डॉ. संगीता राऊत शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख मणीकंठ गादेवार जिल्हा प्रमुख रमेश उप्पलवार एटापल्ली तालुका प्रमुख प्रणय कासवटे यांनी उपस्थित होते

