
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/गोंडपिपरी दि.६ जुन:
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथून जवळच असलेल्या विहीरगाव येथील प.पु.शेषराव महाराज व्यसनमुक्ती मंदिर येथे व्यसनमुक्त झालेल्या गुरूबंधुंचा ५ जुन रोजी सत्कार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांचाही सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विहीरगाव येथे दर शुक्रवारी व्यसनमुक्ती सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.संस्थानच्यावतीने जे गुरूबंधुं व्यसनमुक्त झालेत त्यांचा परीवारासह गुरूबंधुंचा आ.देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते रवि कोहपरे वढोली , प्रविण लोडे घोसरी,जगन हिवरकर, संदिप राऊत, निलेश पुलगमकर,गिलबिले भद्रावती, यांच्यासह अनेक गुरूबंधुंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दानशूर व्यक्तीमत्व सुरेश चौधरी, भाजपा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,अमर बोडलावार,दिपक सातपुते, विनोद देशमुख, राकेश मुन, संस्थानचे अध्यक्ष गणपती चौधरी, सचिव मुन्ना सिडाम,उपाध्यक्ष बाळु पिंपळशेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ.देवरावदादा भोंगळे यांनी व्यसनमुक्त होणे म्हणजे माणसाचा पुनर्जन्म असल्याचे सांगितले तसेच अल्काताई आत्राम, सुरेशजी चौधरी यांनीही उपस्थित गुरुबंधूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थानचे सचिव मुन्ना सिडाम, प्रास्ताविक संस्थानचे अध्यक्ष गणपती चौधरी तर आभार निलेश पुलगमकर यांनी मानले.

