
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी:
पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी येथील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रोशनी वरघंटे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. तसेच एकमेकांना मिठाई भरून आनंद साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा ,राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा विजय जनतेच्या विकासाभिमुख धोरणांचा विजय असल्याचे सांगितले.

यावेळी बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, युवा मोर्चा जिल्हा सचिव दिलीप चलाख, युवा मोर्चा जिल्हा सचिव निरज रामानुजमवार, तालुका महामंत्री शेषराव कोहळे यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

