
नितेश गट्टीवार गडचिरोली, दि.२ मार्च :
भेंडाळा परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाविरोधात एनएसयुआय कडून राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन देत प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यापूर्वी समितीच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते.दरम्यान, YIN मंत्रालय,मुंबई कार्यक्रमानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित असताना संबंधितांना हे निवेदन देण्यात आले.हे निवेदन राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली ओमकार रोंनगे एनएसयुआय जिल्हा महासचिव वर्धा यांच्याकडून देण्यात आले.
एनएसयुआयने सांगितले की, भेंडाळा परिसरातील सुपीक शेती जमीन अधिग्रहित झाल्यास हजारो कुटुंबे भूमिहीन होतील. तसेच, औद्योगिक प्रकल्पामुळे प्रदूषण वाढून आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.याशिवाय एनएसयुआय कडून इशारा देत सांगितले की, जर एमआयडीसी प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात आला नाही, तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल.

दरम्यान, सर्व ग्रामसभा आणि शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध असून, भेंडाळा परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी तात्काळ रद्द करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

