
नितेश गट्टीवार
गडचिरोली ,दि.१ एप्रिल :
सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्चच्या (सर्च) चे व्यसनमुक्ती मुक्तिपथ आरोग्य शिक्षक पदावर कार्यरत प्रभाकरराव केळझरकर दि.३१ मार्च २०२६ रोजी कार्यमुक्त झाले.त्यांचा सेवापुर्ती सत्कार डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

प्रभाकरराव केळझरकर हे सर्च मध्ये सन १९८८ पासुन ते ३१ मार्च २०२६ पर्यंत विविध पदांवर कार्यरत होते.संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आल्याबद्दल प्रभाकरराव केळझरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

