korchi news

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची, दिनांक 21/3/26
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात बिबट्याच्या हालचालीमुळे नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील वार्ड नंबर 13 च्या वामन मोहूरले यांच्या घराजवळ 17 व 20 तारखेला सायंकाळच्या सुमारास बिबट्याने दोन वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही वासरे गम्भीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान आढळलेल्या पायाच्या ठशावरून हा प्राणी बिबट्या असल्याचा प्राथमिक अन्दाज व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अशी ग्रामस्थांची नाराजी आहे.
दरम्यान कोरची गावात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असून त्यामुळे बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांना सहज भक्ष्य मिळत आहे. मोकाट जनावरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अशा जनावरावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायत ला गावकर्यांनी यापूर्वी निवेदन दिले आहे. तसेच जनावराना गो शाळेत पाठविण्याची कारवाई करण्याचेही सुचविले होते. परंतु नगरपंचायत कडून या गम्भीर विषयावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी बिबट्याचा धोका वाढतच असून नागरिकांच्या जीविताला ही धोका निर्माण झाला आहे. newsjagar
सलग दोन घटने नतरही प्रशासन निष्क्रिय असल्याने ग्रामस्थामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने रात्री गस्त घालावी आणि मोकाट जनावराचा बन्दोबस्त करावा. अशी गावकर्यांनी मागणी केली आहे.

