नागपूर प्रतिनिधी
बाप फाऊडेशन तर्फे विभागीय स्तरावरील सामाजिक संस्था प्रतिनिधींची चिंतन बैठक आज रवी भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत माहितीचा अधिकार (RTI) कार्यकर्त्यांच्या संघटन बळकटीसाठी Conference 22 J baop चर्चा करून पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. बैठकीत सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे (वरोरा) VINOD KHOBRAGADE यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष (RTI) पदावर एकमताने निवड करण्यात आली. निवडीप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते त्यांना भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह, गौरव प्रमाणपत्र तसेच माहितीचा अधिकार विषयक पुस्तक प्रदान करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय लोखंडे सर (मुंबई), माननीय डी. वाय.एस.पी. पुरुषोत्तम चौधरी (अँटी करप्शन ब्युरो, नागपूर), माननीय नायबतहसीलदार लांजेकर (भंडारा), श्री. सुरेश दुरुगकर (गोंदिया), श्री. विठोबा ध्यानधन (नाशिक) तसेच श्री. शंकर सलोडकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी माहितीचा अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यावर भर दिला. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विनोद खोब्रागडे यानी आपल्या भाषणात माहितीचा अधिकार हा नागरिक सशक्तीकरणाचा प्रभावी कायदा असल्याचे सांगितले. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कार्यकर्त्यांनी RTI संघटितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जनहिताच्या प्रश्नांवर कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने लढा देण्याचे आवाहनही केले. बैठकीत ठराव मंजूर करून लवकरच पुढील बैठका अमरावती विभाग, संभाजीनगर विभाग तसेच मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली, अधिकाधिक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी ‘बाप’ फाऊंडेशनमध्ये सहभागी होऊन भ्रष्टाचारमुक्त भारत, महाराष्ट्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रनिर्मिती व समाजहिताच्या निर्धाराने करण्यात आला
