
प्रतिनिधी/रुपेश सलामे
:- महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम निर्णय, कठोर प्रशासकीय भूमिका आणि विकासाभिमुख नेतृत्व यांचे प्रतीक असलेले
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अजितदादा पवार
यांचे विमान अपघातात झालेले दुःखद निधन संपूर्ण राज्यासाठी मोठा आघात आहे.
बारामतीपासून विधानभवनापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, कर्तृत्व आणि सातत्याचा इतिहास होता.
आमदार, मंत्री, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना त्यांनी
सिंचन, अर्थकारण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास यांना नेहमीच प्राधान्य दिले.
स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि कामातली शिस्त ही त्यांची ओळख होती.
मतभेद असले तरी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेबद्दल सर्वच स्तरांत आदर होता.
महाराष्ट्राने आज एक कणखर नेतृत्व गमावले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
पवार कुटुंबीय, सहकारी आणि असंख्य समर्थकांच्या दुःखात News जागर सहभागी आहे.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली…
💐 भावपूर्ण आदरांजली…
— News जागर

