कोरची येथील नळाच्या पाण्यात अळ्या. दुषीत पाण्याचा पुरवठा. जिल्हाधिकारी यांना दिली खोटी माहिती.

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
येथील नळाच्या पाण्यात अळ्या सापडल्या असून सम्पुर्ण गावात दुषीत पाणी पुरवठा केल्या जात असल्याची तक्रार गावकर्यांनी केली आहे.
गावात बरेच लोक नळ घेतले आहेत. नळाच्या पाण्याचा नियमित कर सुध्दा भरत आहेत. नळाचे शुद्ध पाणी गावकर्यांना मिळावे म्हणून 25 वर्षापुर्वी पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. टाकी तयार करणारे कारागिर निष्णात नसल्याने टाकी सफाई करताना अडचण होणार नाही, या बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पाण्याची टाकी सफाई करण्यास अडचणीचे आहे. त्यामुळे टाकी मागील 25 वर्षापासून एकदाही सफाई करण्यात आली नाही. newsjagar
गावभर नळ जोडणी करताना किंवा कोणत्याही कारणामुळे बर्याच ठिकाणी नळाचे पाईप फुटले, त्या पाईपमधुन नालीतील पाणी मिसळले गेले. त्या नालीच्या पाण्यातील जन्तु नळाच्या पाण्यासोबत लोकांच्या घरी जात आहे. या पाण्यातून दुषीत येत आहे. काळ्या रन्गाचे, दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करणे शरिरासाठी धोकादायक आहे.
7 जानेवारी ला जिल्हाधिकारी कोरचीच्या दौर्यावर आले असता, गावकर्यांनी पाण्याची समस्या आणि ईतर समस्या सांगीतल्या होत्या. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या माहितीमध्ये गावात शुध्द पाण्याचा पुरवठा केला जात आहे अशी खोटी माहिती दिली आहे.

कोरची येथील नगरपंचायतचा सम्पुर्ण कारभार रामभरोसे असून यावर वाच ठेवणारा प्रशासकीय अधिकारी कुचकामी आहे.

