काँग्रेस राबवणार ‘मनरेगा बचाव संग्राम’
— गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
गडचिरोली ::कोविड-19 महामारीमुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असताना, मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले होते. मात्र, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या मनरेगा योजनेला भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
मनरेगा योजनेचे नाव बदलणे, तसेच या योजनेत मोठ्या प्रमाणावर बदल करून काही मोजक्या कंत्राटदारांना लाभ पोहोचवण्याच्या हेतूने धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. हे बदल अतिशय निंदनीय असून, यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या अन्यायकारक धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि मनरेगा योजना पूर्वीच्या पद्धतीनेच प्रभावीपणे राबवावी, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात ‘मनरेगा बचाव संग्राम’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ब्राह्मणवाडे यांनी दिली.
या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर धरणे आंदोलन, उपोषण तसेच ग्रामसभांच्या माध्यमातून मनरेगा योजना पूर्ण क्षमतेने पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव एड. विश्वजीत कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, समशेर खान पठाण, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक मेघा वरगंटीवार, माजी जि. प. सदस्य कविताताई भगत, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुस्पलताताई कुमरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, पंचायत राज सेल अध्यक्ष नरेंद्र डोंगरे, अनुसूचित जातीचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, श्रीनिवास ताडपल्लीवार, चारुदत्ता राऊत,स्वप्नील बेहरे, कल्पनाताई नंदेश्वर, कविताताई उराडे, रिता ताई गोवर्धन, सौं. पौर्णिमाताई भडके, मीनल ताई चिमुरकर सौं. शीतलताई ठवरे, सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
