
कोरची. दि. 31/10/25
सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त, येथील फवारा चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत 31 आक्टोबर ला सकाळी रन फार युनीटी अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आले.
या मॅरेथॉन स्पर्धे मध्ये युवक, युवती, प्रोढ, वयस्क आणि अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
2024-25 मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय रिले स्पर्धेत भाग घेणारा विद्यार्थी रितेश रमेश हलामी या विद्यार्थ्यांने हीरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धे ला सुरूवात करण्यात आली. रितेश हलामी हा कोरची तालुक्यातील कोहकाबोडी या गावातील रहिवासी असून एकलव्य विद्यालय कोरची येथे 9 व्या वर्गात शिकत आहे. newsjagar

यावेळी तहसीलदार प्रशांत गड्डम, पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, प्रतिष्ठीत नागरिक नसरू भामाणी, डॉ. शैलेंद्र बिसेन , डॉ. स्वप्नील राऊत, मनोज अग्रवाल, कमल खंडेलवाल, नंदकिशोर वैरागडे, मधुकर नखाते, शालीकराम कराडे, आणि गावकरी उपस्थित होते.स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेणाऱ्या युवक आणि युवतींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहन पर रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले.


