
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
कोरची korchi
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आढावा सभेला 28/10/2025 रोजी मंगळवारला सकाळी ठीक 11.30, वाजता तहसिल सभागृहात आयोजित करण्यात आले. सभेचे अध्यक्ष म्हणून प्रंशात गडृम तहसीलदार कोरची, प्रमुख अतिथी म्हणून कुमारी बाई जमकातन सामाजिक कार्यकर्ते, राजाराम नैताम ग्रामसभा अध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित होते.
तरी तालुकास्तरीय सर्व यंत्रणा अधिकारी यांच्या अधिनिस्त असलेले कर्मचारी वनरक्षक ,कृषी सहाय्यक,कनिष्ठ अभियंता यांचे कार्यक्षेत्रात किमान दोन कामे सुरू असणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने खालील विषय सूचिनुसार सदर आढावा बैठकीस अद्यावत माहितीसह उपस्थित होते,

सदर आढावा सभेला सर्व यंत्रणे अधिकारी कर्मचारी यांनी दिलेल्या वेळेस उपस्थित राहावे याची दक्षता घ्यावी असे पत्राद्वारे कळविण्यात आले. या आढावा सभेमध्ये अपूर्ण कामे पूर्ण करणे ,बांबू लागवड रोपांची मागणी, सेल्फ वरील कामाची यादी, मंजुरांचे E -KYC, केवायसी करणे, Timely peyment ,GEO Tag, युक्तधार – ई सक्षम , E- MB आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. #newsjagar
त्यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आढावा सभेला सर्व यंत्रनेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसभा अध्यक्ष व सचिव, APO, TPO, CDEO तसेच ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.
या सभेचे संचालन. सरोज तितरमारे यांनी केले

