
एकूण १३ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित; विविध प्रवर्गांतील महिलांना प्रतिनिधित्वाची संधी
गडचिरोली : नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपरिषद कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.
सोडतीनुसार एकूण १३ प्रभागांसाठी आरक्षण निश्चित झाले असून, प्रत्येक प्रभागातील जागा विविध प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.

१)प्रभाग क्रमांक १ मधील ‘अ’ जागा अनुसूचित जाती (महिला) तर ‘ब’ जागा सर्वसाधारण वर्गासाठी राखीव आहे.
२)प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमात व सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांना अनुक्रमे जागा राखीव ठरल्या आहेत.
३)प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला) असा क्रम असून,
४)प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जमात (महिला) आणि सर्वसाधारण वर्ग,
५)प्रभाग क्रमांक ५ मध्ये अनुसूचित जाती (महिला) आणि सर्वसाधारण वर्ग,
६)तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला) असा आरक्षणाचा क्रम आहे.
७)प्रभाग क्रमांक ७ मध्ये अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागासवर्ग (महिला),
८)प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण,
९)प्रभाग क्रमांक ९ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण (महिला),
१०)प्रभाग क्रमांक १० मध्ये अनुसूचित जमात आणि सर्वसाधारण (महिला),
११)प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनुसूचित जमात (महिला) आणि सर्वसाधारण,
१२)प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण,
१३)प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

