सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिध
गडचिरोली/ चामोर्शी,23 सप्टेंबर 2025::- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदी असलेल्या कांदबाने याची नुकतीच तात्काळ बदली झाल्याने यांच्या जागेवर भामरागड पोलिस स्टेशन ईथुन बदली होऊन आलेले चामोर्शी पोलीस स्टेशन १३ सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक दिपक डोंब नव्याने रुजू झाले होते. यांचे स्वागत आज डिजिटल मिडिया पत्रकार संघा तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांच्याशी डिजिटल मिडिया संघाने चामोर्शी शहरातील समश्या बाबत सविस्तर चर्चा केली असता, चामोर्शी शहरातील समस्या पण लवरच दूर करू असे आश्वासन सुद्धा यावेळी पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांनी डिजिटल मिडिया पत्रकार संघाना व्यक्त केली.समस्येबाबद विशेष हत्ती गेट पॉईंट,आष्टी टी पॉईंट हे अति धोकादायक वळण व गर्दीचे ठिकाण असून याकडे ट्राफिक पोलीस यांनी लक्ष घालावे,तसेच CCTV मुख्य चौकात लावणे,ट्रिपल सीट bike रायडर्स यावर आडा घालावे अशी सविस्तर चर्चा करून PI दीपक डोंब यांनी या समस्या नक्की दूर करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी NEWS JAGAR चे जिल्हाप्रतिनिधी सोनू वाळके, VAINGANGA NEWS 24 चे मुख्य संपादक श्रावण वाकोडे, बुलेटिन चे जिल्हाप्रतिनिधी प्रकाश बन्सोड,NEWS NATIONA चे जिल्हा प्रतिनिधी हस्ते भगत, MAHARASTR LIVE NEWS तालुका प्रतिनिधि धनराज वासेकर,VAINGANGA NEWS YOUTOUBE चे गडचिरोली विशेष प्रतिनिधी सुसाखर झाडे ,नवराष्ट्र निर्माण तालुका प्रतिनिधि मारुति बारसागडे, उपस्थित होते.
